मोठी बातमी …. दोन्ही डोस घेणाऱ्यांना मिळणार ही सवलत; उपमुख्यमंत्र्यांपाठोपाठ आरोग्य मंत्र्यांनी दिले संकेत.

मुंबई दि.21 जुलै – आज सकाळी पिंपरी चिंचवड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोरोना लसीचे (Corona vaccine) दोन्ही डोस घेणाऱ्यांना आता बाहेर पडण्याची परवानगी दिली पाहिजे असे मत व्यक्त केले. त्यापाठोपाठ राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही दिसालादायक म्हणजे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी निर्बंध शिथिल करण्याची गरज असल्याचे मत माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

(Big news …. those who take both doses will get this discount; The Deputy Chief Minister was followed by the Health Minister.)

आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये माध्यमांशी बोलताना, “दोन डोस घेतलेल्यांना आता बाहेर पडण्याची परवागनी दिली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. याबाबत पुढच्या दोन दिवसात मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे,” असं मोठं सूचक विधान केलं आहे. यामुळे, लवकरच राज्यातील दोन डोस घेतलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार असण्याची शक्यता आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेच्या (Third wave of corona) पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र राज्यात अनेक ठिकाणी आजही निर्बंध (restrictions) कायम आहेत. मुंबईतील लोकल कधी सुरू होणार, तसेच राज्यात अनलॉक कधी होणार, अशा अनेक मुद्द्यांवर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी भाष्य केले आहे. दिसालादायक म्हणजे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी निर्बंध शिथिल करण्याची गरज असल्याचे राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

तिसऱ्या लाटेच्या (Third wave of corona) पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, तिसरी लाट येऊ शकते पण ते कधी येईल हे आपल्यावर आहे. आपण जर कोरोनाचे नियम व्यवस्थित पाळले तर आपल्याला कोरोनाची तिसरी लाट थोपवता येऊ शकेल. तसेच लसीकरण (vacccination) सुद्धा रामबाण उपाय असल्याचे राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले.

ICMR ने पहिला रुग्ण आढळल्यापासून काही नियम आखून दिले आहेत. त्या नियमानुसारच महाराष्ट्रात काम सुरु आहे. आयसीएमआरने (ICMR) सिरो सर्व्हे केला आहे. त्यानुसार त्यांनी आम्हाला सांगावे प्रोटोकॉल द्यावे. कशाप्रकारे निर्बंधामध्ये सुट देता येईल या संदर्भात सुचना द्याव्यात. कारण आताच केंद्राच्या टिम येऊन गेल्या. त्यांनी निर्बंध पाळणे, टेस्टींग वाढवणे, अशा सुचना दिल्या. त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच आमची वर्तवणुक असते. आयसीएमआरने (ICMR) मार्गदर्शन केल्यास आम्हाला निर्णय घेता येईल असं ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!