बीड कोरोना अपडेट; दिवाळीत वाढ… पहा कशी आहे जिल्ह्याची स्थिती.

बीड दि.4 नोव्हेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 724 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 12 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 712 जण निगेटिव्ह आली आहेत. आज सहा तालुक्यात पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तीन दिवसानंतर आज संख्येत किंचित वाढ झाली आहे.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-1, अंबाजोगाई-3, आष्टी-3, धारुर-0, गेवराई-0, केज-1, माजलगाव-3, परळी-1, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या सोमवारी 3, मंगळवारी 9 तर बुधवारी 6 होती. आज संख्येत वाढ होवून 12 झाली आहे. आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार बुधवारी 11 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मृत्यू संख्येत एकने वाढ होवून जिल्ह्यात मृत्यूची एकुण संख्या 2808 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 101 झाली आहे.
दरम्यान, राज्यात बुधवारी 1193 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली आहे तर 39 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात राज्यामध्ये 1,599 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्याचा रिकव्हरी रेट हा 97.6 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यातील मृत्यूदर हा 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात सध्या 15 हजार 119 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1,87,286 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 895 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6,,29,47,355 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.