शैक्षणिक

दहावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट; असा पहा निकाल.

पुणे दि.16 जुन – बारावीचा निकाल लागून काही दिवस उलटले असून आता दहावीच्या निकालाची उत्कंठा वाढली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 17 जून रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

बारावीचा निकाल लागुन जवळजवळ आठवडा उलटत आहे. मात्र शाळा सुरु होवूनही अद्याप दहावीचा निकाल घोषित झाला नाही. कलागुणांच्या प्रस्तावास मुदतवाढ दिल्यामुळे आणि विद्यार्थ्यांचे कलागुण निकालात समाविष्ट करायचे असल्यामुळे निकालास थोडा उशीर होत आहे. यंदा राज्यात जवळजवळ 17 लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिलेली आहे. या विद्यार्थ्यांसह पालकांचीसुध्दा निकालासाठी उत्सूकता शिगेला पोहोचली आहे.

राज्य मंडळाच्या नऊ विभागांपैकी दोन विभागांचे काही काम शिल्लक राहिले होते. मात्र मंडळाकडून सर्व काम पुर्ण करण्यात आली असून आता उत्कंठा संपलेली आहे. त्यामुळे उद्या दि. 17 तारखेला दुपारी 1 वाजता अॉनलाईन निकाल (Online result) जाहीर होणार आहे. अशी अधिकृत माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांना दिली.

असा पाहा निकाल
पुढच्या काही तासांत दहावीचा निकाल जाहीर झालेला असेल आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका ऑनलाईन (Online) मिळालेल्या असणार आहेत.  www.maharesult.nic.in या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरून विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. वेबसाईट ओपन झाल्यावर विद्यार्थ्यांनी SSC हा पर्याय निवडावा. त्यानंतर रोल नंबर आणि आईचे नाव हे पर्याय विचारले जातात. ते भरल्यानंतर विद्यार्थ्याला त्याचा निकाल पाहता येणार आहे. दरम्यान दहावीचा निकाल यंदा 12वी प्रमाणेच बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट्स msbshse.co.in, hscresult.mkcl.org, mahresult.nic.in. वरही पाहता येणार आहे.

( Big update on X results; Here is the result. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!