घात-अपघात

Bike accident … टेम्पोच्या धडकेत धारुर तालुक्यातील तरुण ठार ; दुचाकी अपघातामुळे एकाच गावावर आली शोककळा.

55 / 100

किल्लेधारुर दि.23 जुलै – Bike accident टेम्पोच्या धडकेत धारुर तालुक्यातील तरुण ठार झाल्याची घटना केजमध्ये Kaij रात्री घडली. मामाच्या मुलीच्या लग्नासाठी व्यवस्थापन करत असताना तरुणावर काळाने झडप घातल्याने धारुर तालुक्यातील खोडस या गावात हळहळ व्यक्त होत आहे. सकाळी याच गावातील दुचाकीवर प्रवास करणारा एक तरुण Dharur Ghat धारुर घाटातील Bike accident अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे गावावर शोककळा आली आहे. (Bike accident… Dharur taluka youth killed in tempo collision; Due to two accidents, grief came to the same village.)

याबाबत मिळालेली माहिती अशी की, धारुर Dharur तालुक्यातील खोडस येथील तरुण अजय वैजेनाथ गायसमुद्रे हा आपल्या मामाच्या मुलीच्या दि.23 रोजी होत असलेल्या लग्नासाठी केज येथे आला होता. शनिवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास लग्न व्यवस्थापनासाठी दुचाकीवरुन (क्र.एमएच 44 एए 9591) केज शहरातील तिरुपति मंगल कार्यालयाकडे जात होता. यावेळी स्वागत हॉटेलसमोर टेम्पोने (क्र.एमएच 14 केए 3241) जोराची धडक दिली. या अपघातात Bike accident अजय गायसमुद्रे (रा.खोडस ता.धारुर) हा तरुण गंभीर जखमी झाला. जखमी तरुणास केज उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन अंबाजोगाई स्वा.रा.ति. रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना रात्री त्याचे निधन झाले.

दुसऱ्या अपघातात खोडसचा तरुण गंभीर जखमी.
दरम्यान आज रविवारी सकाळी धारुर घाटात Dharur Ghat झालेल्या अपघातात खोडस येथील महेश बलभिम लाखे हा तरुण तेलगावकडे दुचाकीवरुन जात असताना गंभीर जखमी झाला. एकाच गावातील दोन तरुणांसोबत दोन वेगवेगळ्या अपघाताच्या accident घटना घडल्या. केज Kaij येथील अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार झाला तर धारुर Dharur येथील अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. यामुळे खोडस गावावर शोककळा पसरली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!