घात-अपघात

bike accident… धारुर तेलगाव रस्त्यावर दुचाकी अपघातात तरुण ठार.

55 / 100

किल्लेधारुर दि.23 अॉक्टोंबर – bike accident तेलगावहून गावाकडे जाणाऱ्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात bike accident दुचाकीवरील तरूण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी रात्री दहा वाजे दरम्यान तेलगाव धारूर Dharur  महामार्गावर (National Highway) घडली.

तेलगाव पासुन जवळच असलेल्या बोडखा ता.धारूर येथील कृष्णा सुदाम तिडके हा तरूण रविवारी रात्री तेलगावहून बोडखा या गावाकडे आपल्या दुचाकी क्र.एम.एच.44- जे 4636 वरून जात होता. तेलगाव धारूर Dharur महामार्गावर (राष्ट्रीय महामार्ग 548 सी) National highway तेलगाव ते कारीच्या दरम्यान रात्री दहा वाजेच्या दरम्यान अज्ञात वाहनाने कृष्णा तिडके या तरूणाच्या दुचाकीस जोराची धडक दिली. या अपघातात accident कृष्णा तिडके याचा जागीच मृत्यू झाला. मयत तरुण हा ट्रक चालक असल्याचे कळते. त्याच्या पश्चात आई वडील, भाऊ, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. त्याच्या अपघाती मृत्युने बोडखा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!