Bike theft… चक्क न्यायालयाच्या आवारातून मोटार सायकल लंपास; धारुर मधील प्रकार.

किल्लेधारूर दि.24 फेब्रुवारी – Bike theft… धारूर येथे न्यायालय आवारातून पार्कीग झोन मध्ये लावलेली वकिलाची मोटार सायकल चोरीस जाण्याचा प्रकार घडला. या वरून अज्ञात मोटार सायकल चोरा ( Motorcycle theft ) विरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
धारूर येथे दिनांक 21 फेब्रुवारी रोजी धारूर न्यायालयात काम करीत असलेले अॕड. महादेव भीमराव वाव्हळ यांची मोटर सायकल क्र. एम एच 44 एफ 428 हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटर सायकल न्यायालयाच्या पार्किंग झोन मध्ये नियमीत पणे लावली. या पार्कीँग झोन मधून अज्ञात चोरट्यानी सदर मोटार सायकल चोरून ( Motorcycle theft ) नेली. ॲड. वाव्हळ यांच्या तक्रारीवरून धारूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोराविरुद्ध गु. र. नं. 33/2024 कलम 379 भारतीय दंड संहिता 1860 प्रमाणे दिनांक 22 फेब्रुवारी रोजी नोंदवण्यात आला असून पुढील तपास धारुर पोलीस करीत आहे.