आजचे कोरोना रुग्ण… पहा किती अन कुठले आहेत रुग्ण

किल्लेधारूर दि.४(वार्ताहर)- येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये आज ७ ॲन्टीजन (antigen) तपासणी करण्यात आल्या. यात २ रुग्ण पॉझिटीव्ह (Positive) आढळली आहेत. तर येथून काल पाठवण्यात आलेल्या ८ स्वॅब अहवाल पैकी २ पॉझिटीव्ह आले आहेत. आजची पॉझिटीव्ह (Positive) संख्या ४ आहे.
आज सतत दुसऱ्या दिवशी ॲन्टीजन व स्वॅब (Swab) नमुन्यात ४ पॉझिटीव्ह आढळली आहेत. आज केवळ ७ ॲन्टीजन चाचण्या झाल्या. यात २ रुग्ण पॉझिटीव्ह (Positive) आढळली आहेत. तर कालची ८ स्वॅब (Swab) नमुने पैकी २ पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. आज एकुण ४ रुग्ण पॉझिटीव्ह (Positive) असून ५ जनांचे स्वॅब नमुने अंबाजोगाईला तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.
ॲन्टीजन (Antigen)
१. ५० वर्षीय स्त्री, चोंडी, ता. धारुर
२. ६० वर्षीय पुरुष, अंजनडोह, ता. धारुर
स्वॅब (Swab)
३. २५ वर्षीय पुरुष, तेलगाव, ता. धारुर
४. ३८ वर्षीय पुरुष, तेलगाव, ता. धारुर
यांचा समावेश आहे.