भाजप हा उन्माद आलेला पक्ष; गायकवाडांचा सतीश चव्हाण यांना पाठिंबा…

औरंगाबाद दि.१७- पदवीधर मतदारसंघातून माघार घेत भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणारे माजी केंद्रीय मांत्री जयसिंगराव गायकवाड पाटील Jaysingrao Gaikwad यांनी भाजपावर घणाघाती आरोप करत भाजप BJP हा हवेत उडणारा व उन्माद आलेला पक्ष असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP उमेदवार सतीश चव्हाण Satish Chavan यांना पाठिंबा दिला.
आज औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील Aurangabad graduates constituency उमेदवारांसाठी माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. आजचा दिवस खऱ्या अर्थाने भाजपासाठी डोकेदुखी ठरली. भाजपाचेच BJP बीडचे Beed माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे Ramesh Pokale हेही बंडखोरी करत निवडणूकीत उतरले आहेत. माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड पाटील Jaysingrao Gaikwad यांनी माध्यमाला प्रतिक्रिया देताना भाजपाला मस्ती आलेली असुन हा हवेतला पक्ष झाला आहे. सध्या भाजपाला उन्माद आलेला असुन आता भाजपाला हरविणे हाच उद्देश असल्याचे स्पष्ट केले. भाजपाची मस्ती उतरवण्यासाठीच माघार घेतल्याचे सांगत राष्ट्रवादीचे NCP अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण Satish Chavan यांना पाठिंबा दिला.