कोरोंना विशेष

अंबाजोगाईत कोरोना कहर सुरुच; बीड, आष्टी व केज शतकी संख्या, धारुर 25.

बीड दि.15 एप्रिल- आज बीड (Beed) जिल्ह्यातील 3799 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 963 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2836 जण निगेटिव्ह आली आहेत.

(Corona havoc in Ambajogai; Beed, Ashti and Kaij century numbers, Dharur 25.)

आज एकोणचाळिसाव्या दिवशी बीड तालुक्यात 167 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आज पुन्हा सर्वाधिक अंबाजोगाईत 230 व आष्टी तालुक्यात 116 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 25 केजमध्ये 106 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-167, अंबाजोगाई-230, आष्टी-116, धारुर-25, गेवराई-49, केज-106, माजलगाव-70, परळी-69, पाटोदा-59, शिरुर-43, वडवणी-29 अशी आहे.

कोविड-19 (covid-19) चा जिल्ह्यात उद्रेक वाढला आहे. बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या वाढत असल्याने आता कोविड काळजी केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कुठल्याही स्वरुपाच्या माहितीसाठी आता 24 तास कर्मचारी नेमण्यात आले आहेत. जिल्ह्यात कुठल्याही कोविड सेंटरमधील उपलब्ध खाटा व रुग्णालयाबाबतची माहिती तसेच प्रशासनाला काही सुचना अवगत करावयाच्या असल्यास 02442- 222604 या क्रमांकावर तर औषध उपलब्धते बाबतच्या अनुशंगाने किंवा रेमडीसीवीर इंजेक्शन च्या उपलब्धतेच्या अनुशंगाने अन्न व औषध प्रशासनाच्या 8446165371 या क्रमांकावर संपर्क करता येणार आहे.

जिल्ह्यात आता कोविड सेंटर फुल होत असुन इतर समस्या पुढे येत आहेत. काल बुधवारी रात्री 8 पासून राज्यात कलम 144 लागू करत संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील पंधरा दिवस यामुळे सर्वांना घरातच रहावं लागणार आहे. आजच्या पहिल्या दिवशी कडकडीत बंद असताना सडक सख्याहरी रस्त्यावर भटकत असल्याचे दिसून आले. तर पोलिस प्रशासनाला आता कठोर भुमिका घेण्याची वेळ आली आहे. व्यापाऱ्यांनी मात्र कडकडीत बंद ठेवत चांगला प्रतिसाद दिला आहे.

दरम्यान, देशात गेल्या 24 तासात 2 लाख 739 करोना रुग्ण आढळले असून 93 हजार 528 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तसंच 1038 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबतच देशातील एकूण रुग्णसंख्या 1 कोटी 40 लाख 74 हजार 564 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 1 कोटी 24 लाख 29 हजार 564 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.

महाराष्ट्रात 24 तासांत 58 हजार 952 नवे कोरोना रुग्ण आढळले. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या कोरोना रुग्णांपैकी 39 हजार 624 जण मागील 24 तासांत कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे राज्यात 24 तासांत 278 मृत्यू झाले. आतापर्यंत महाराष्ट्रात 35 लाख 78 हजार 160 कोरोना बाधीत आढळले. यापैकी 29 लाख 5 हजार 721 कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे 58 हजार 804 जणांचा मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!