भाजपा महिला मोर्चा पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आक्रमक; पोलिसांची कारवाई…. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर गुन्हा

मुंबई : दि.२७ -पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan suicide case) महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेले संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव समोर आल्याने भाजपने (BJP) हा मुद्दा हाती घेत पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan suicide case) उडी घेतली आहे. दरम्यान, भाजप महिला मोर्चाने आज आक्रमक पावित्रा घेत राज्यभर आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या महिलांना ताब्यात घेतले. तर दुसरीकडे भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीवर २०१६ साली कारवाई झालेल्या एका प्रकरणात बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याने एसीबीने गुन्हा नोंदवला आहे.
(BJP Mahila Morcha aggressive in Puja Chavan suicide case; Police action …. Crime against Chitra Wagh’s husband Kishor Wagh)
पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव समोर आल्यानंतर भाजपाने संजय राठोड याचा राजीनामा मागितला होता. मात्र, राठोड यांनी अद्यापपर्यंत हा राजीनामा दिला नसल्यामुळे कारवाईसाठी भाजपच्या वतीने हे आंदोलन केले जात आहे. आज दि.२७ शनिवारी भाजप महिला मोर्चाने राज्यात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन केले.
भाजपा प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष उमा खापरे यांनी पूजा चव्हाण या तरुणीच्या संशयास्पद मृत्यूची राज्य सरकार चौकशी करणार आहे की नाही? असा सवाल उपस्थित आहे. याप्रकरणी भाजपतर्फे शुक्रवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी पूजाच्या मृत्यूची चौकशीची घोषणा तातडीने केली नाही आणि संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा राजीनामा घेतला नाही तर, महिला मोर्चातर्फे राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तर येत्या १ मार्चला उग्र आंदोलनाचा इशारा भाजपतर्फे (BJP) दिला आहे. भाजपा ओबीसी मोर्चा ३ मार्चला आसूड आंदोलन करणार आहे.
दुसरीकडे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचे पती किशोर वाघ (Kishor Wagh) यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता बाळगल्या प्रकरणी एसीबीकडून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्यावर २०१६ मध्ये एसीबीकडून कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी आज एसीबीकडून वाघ यांनी बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याचा ठपका ठेवत गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, भाजपाने सदरील कारवाई ही चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी गेल्या काही दिवसात पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आक्रमक भुमिका घेत मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यामुळे ही कारवाई सुडबुध्दीने केली असल्याची प्रतिक्रिया भाजपाने दिली. या प्रकरणी नाशिक येथे चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद सुरु आहे.