घात-अपघात

Accident .. धारुर तालुक्यात भीषण अपघात ; टिप्पर व ॲपेची समोरासमोर धडक.

69 / 100

किल्लेधारुर दि.27 फेब्रुवारी – Accident .. धारुर तालुक्यातील थेटगव्हाणजवळ ॲपे व टिप्परची समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. मयत व जखमी हे तालुक्यातील अंबेवडगाव व गांवदरा येथील असल्याचे समजते. जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन अंबाजोगाई येथे हलवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अपघातात जखमींची नावे पुढील प्रमाणे आहेत. सुभाष बडे, रा. गांवदरा (वय 35), हौसाबाई घुले, रा. आंबेवडगाव (वय 80), भागवत घुले, रा. अंबेवडगाव (वय 60), संगिता रामा घोळवे, रा. अंबेवडगाव (वय 40), भागवत लक्ष्मण भांगे, रा. गांवदरा (वय 38), गवळण तिडके, रा. गांवदरा (85).

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!