भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं आणखी एक मोठं विधान; ‘सिल्वर ओक’वर राष्ट्रवादीची खलबंत

पुणे/मुंबई दि.6 एप्रिल- राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी गृहमंत्री मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आणखी एक मोठं विधान केलं आहे. येत्या आठ दिवसात आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. मात्र, या मंत्र्याचं नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे ठाकरे सरकारमधील कोणता मंत्री राजीनामा देणार? याबाबतचे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. तर मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थानी सिल्वर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक मंत्री व नेत्यांची सकाळ पासून ये-जा सुरु आहे. यामुळे ‘सिल्वर ओक’वर (Silver Oak) पुन्हा राजकीय खलबंत होत असल्याचा अंदाज आहे.

(BJP state president Chandrakant Patil made another big statement; NCP’s agitation on ‘Silver Oak’
(third maharashtra minister will resign within week, says chandrakant patil)

येत्या आठ दिवसात तिसऱ्या मंत्र्याचा राजीनामा होणार आहे. तो मंत्री कोण आहे, हे तुम्हीच शोधा, असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. तसेच तुमच्या कर्माने तुम्हीच मरणार आहात, अशी टीकाही त्यांनी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी हा दावा केला आहे.

भाजपचा आज वर्धापन दिन होता. त्यामुळे आम्ही सर्वांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये आम्ही स्वबळावर लढून चांगलं यश मिळवलं आहे. त्यामुळे या पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही 2024 मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहोत. कुणाच्याही कुबड्या आम्हाला नकोत. अर्थातच आमचे सहयोगी पक्ष आमच्यासोबत असतीलच, असंही ते म्हणाले. स्वबळावर लढून राज्यात सरकार आणणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी लॉकडाऊनवरून (Lockdown) ठाकरे सरकारवर टीका केली. लॉकडाऊनवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फसवणूक केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी विकेंड लॉकडाऊनबाबत चर्चा करण्यात आली होती. मात्र पत्रक पूर्ण लॉकडाऊनचं (Lockdown) काढण्यात आलं, अशी टीका केली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक (Silver Owk) या निवासस्थानी सकाळपासूनच राजकीय नेत्यांच्या हालचाली दिसून येत आहेत. परमबीर सिंग यांच्या पत्रातील आरोपासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या सीबीआय (CBI) चौकशीच्या निर्णयाविरोधात महाविकासआघाडी आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याकडून दंड थोपटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निर्णयाविरोधात राज्य सरकार आणि अनिल देशमुख स्वतंत्रपणे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करतील, अशी माहिती समोर येत आहे. ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी हे महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणार असल्याचे सांगितले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर मुंबईतील शरद पवार (Sharad Pawar) यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेदेखील सिल्व्हर ओकवर दाखल होत आहेत. त्यामुळे याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होऊन सर्वोच्च न्यायालयात सीबीआय (CBI) चौकशीच्या निर्णयाविरोधात जायचे की नाही, याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!