आज धारुरच्या २१ स्वॅबची प्रतिक्षा

किल्लेधारूर दि.५(वार्ताहर) आज शहर व तालुक्यातील २१ लोकांचे थ्रोट स्वॅब अंबाजोगाई स्वा.रा.ति. प्रयोगशाळेत पाठवण्यात आली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे व वैद्यकीय अधिक्षक डॉ.चेतन आदमाने यांच्या कडून मिळाली.
बीड जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. काल परळी येथील बँकेच्या पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आल्याने खळबळ उडाली आहे. राज्यातील हॉटस्पॉट झोन मधून आलेल्या व ज्यास ५ ते १४ दिवस पुर्ण झालेत अशा तालुक्यातील १४ व्यक्तींचे तर ७ आरोग्य कर्मचाऱ्यांची स्वॅब घेण्यात आली आहेत. यात शहरातील १० व ग्रामीण भागातील ४ लोकांसह शासकीय रुग्णालयातील एका डॉक्टरसह ७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आज सांयकाळ पर्यंत या नमुन्याचे अहवाल येणार असून संध्याकाळी १७ जन स्वॅबसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. शेकडे व डॉ.आदमाने यांनी दिली.