बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुलीची ब्लॅकमेलिंग; माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेने खळबळ.

बीड दि. 20 फेब्रुवारी – बीड (Beed) जिल्ह्यातील कडा याठिकाणी माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका नराधमाने शरीरसुखासाठी एका अल्पवयीन मुलीला (Minor girl) ब्लॅकमेल ( blackmail ) केलं असून आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

( Blackmailing of a minor girl in Beed district; Excitement over an incident that tarnishes humanity. )

आरोपीनं पीडित अल्पवयीन मुलीच्या मानसिक स्थितीचा फायदा घेऊन तिचं लैंगिक शोषण ( Rape ) केलं आहे. तसेच अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं पीडितेकडून 15 हजार रुपये उकळले आहेत. अखेर हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आष्टी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यासह (POCSO) अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल ( FIR ) केला आहे.

शुभम श्रीमंत सोनवणे असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. तर 16 वर्षीय पीडित मुलगी मनोरुग्ण आहे. आरोपी शुभम याने दारुच्या नशेत अनेकदा पीडितेला फोन करून शरीरसुखाची मागणी केली. नग्न फोटो पाठव नाहीतर, घरी येऊन सर्व प्रकार सांगेन, अशी धमकी आरोपीनं दिली होती.

आरोपीच्या धमकीला घाबरून पीडित मुलीने आपले नग्न फोटो आरोपीला पाठवले होते. त्यानंतर संबंधित फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं पीडितेचं अनेकदा लैंगिक शोषण केलं आहे. आरोपीनं 15 हजार रुपये घेऊन हॉटेलवर ये, अन्यथा फोटो व्हायरल करेन, अशी धमकी देखील दिली. यानंतर आरोपीनं पीडितेकडून 15 हजार रुपये उकळून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला आहे.

नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने पीडित मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. फोटो व्हायरल झाल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी आष्टी (Ashti) पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह, समाजात बदनामी केल्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस ( Police ) करत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!