शैक्षणिक

Block Education Office… कार्यालय सुरु होवून २५ वर्ष उलटले… मात्र अद्यापही राष्ट्रीय सणाचे ध्वजारोहन नाही; धारुर तालुक्यातील प्रकार.

62 / 100 SEO Score

किल्लेधारुर दि.27 जानेवारी – Block Education Office… धारुर येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालय स्थापना होवून तब्बल 25 वर्ष उलटले. मात्र या कार्यालयात आजपर्यंत राष्ट्रीय सणानिमित्त national festival होणारे कोणतेही ध्वजारोहन flag hoisting होत नसल्याचे समोर आले आहे. याबाबत तहसीलदार जे.के. कांबळे यांच्याकडे तक्रार देण्यात आली आहे.

१५ अॉगस्ट १९९२ रोजी निर्मिती झालेल्या धारुर तालुक्याला नेहमीच संघर्ष करुन वेगवेगळी कार्यालय मंजूर करुन घ्यावी लागली. यातीलच एक कार्यालय गट शिक्षणाधिकारी Block Education Office… कार्यालय. १९९९ मध्ये जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर गट शिक्षणाधिकारी कार्यालयाची स्थापना झाली. कार्यालय निर्मिती नंतरही अनेक वर्ष या कार्यालयात समाविष्ट काही भागाचा कारभार मात्र केज कार्यालयातूनच हाकला जात होता. या कार्यालयात येणारे अधिकारी देखील सातत्याने प्रभारीच असत. आजही येथे गट शिक्षणाधिकारी म्हणून गणेश गिरी हे प्रभारी गट शिक्षणाधिकारी म्हणून काम पाहत आहेत. कार्यालय निर्मिती होवून तब्बल २५ वर्ष उलटले. या कार्यालयात कोणतेही ध्वजारोहन होत नसून शेजारी असलेल्या पंचायत समिती कार्यालयात गशिअ कार्यालयातील कर्मचारी ध्वजारोहन flag hoisting करतात अशी माहिती खुद्द प्रभारी गट शिक्षणाधिकारी गिरी यांनी दिली. याबाबत सेवानिवृत्त मुख्याध्यापक आशोक घायाळ यांनी तहसीलदार जे.के. कांबळे यांच्याकडे तक्रार दिली असून स्वतंत्र कार्यालय असल्याने राष्ट्रीय सणाचे national festival ध्वजारोहन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!