साळेगाव येथे भर रस्त्यावर महिलेचा मृतदेह; परिसरात खळबळ.

केज दि.25 एप्रिल – केज तालुक्यातील शहरापासून अवघ्या सात ते आठ किमी अंतरावर असलेल्या खामगाव सांगोला राष्ट्रीय महामार्गावरील साळेगाव या गावा नजीक एका महिलेचा मृतदेह (Dead Body) राष्ट्रीय महामार्गावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
(Body of a woman on Road in Salegaon; Excitement in the area.)
साळेगाव ता.केज नजीक असलेल्या कळंब कडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाजवळ एका अंदाजे 35 वर्षीय महिलेचा मृतदेह (Dead Body) आढळून आला आहे. सदरील महिलेच्या तोंडावर तीक्ष्ण हत्याराचे वार दिसत असून बाजूलाच मिरचीची पूड तसेच एक घड्याळ पडल्याचे निदर्शनास आले. तर याच परिसरात एक व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत तिथे असल्याचे सांगितल्या जातात असून त्याला उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली असून घटनास्थळी केज पोलिसांनी (Police) धाव घेतली. भर दिवसा झालेल्या या घटनेमुळे परिसरात उलटसूलट चर्चा होत आहे. घटनास्थळी एक जखमी आढळून आल्याने पोलिस (Police) त्या व्यक्तीचा या घटनेशी संबंध आहे का? याचा शोध घेवून लवकरच तपास लागण्याची शक्यता आहे.