पीएनबी घोटाळ्यात धारुर तालुका ईडी, सीबीआयच्या रडारवर.

53 / 100

किल्लेधारूर दि.31 मार्च – पीएनबी घोटाळ्यात धारुर तालुका ईडी, सीबीआयच्या रडारवर आल्याचे दिसून येते. हल्लीच्या काळात ईडी व सीबीआयच्या कारवायामुळे देशभर चर्चा रंगल्या जातात. आता थेट धारुर सारख्या तालुक्यात ईडी व सीबीआयची कारवाई झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
( Dharur taluka ED on CBI’s radar in PNB scam. )

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बीड (Beed) जिल्ह्यातील धारूर (Dharur) तालुक्यात मुंगी गावच्या पांडुरंग सोळंके यांनी 2010 साली शिवपार्वती सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीस सुरुवात केली. या कारखाना उभारणीसाठी त्यांनी नंदकुमार तासगावकर आणि राजेश तासगावकर यांना सोबत घेऊन एक करार केला. काही काळानंतर नंदकुमार तासगावकर आणि राजेश तासगावकर यांनी बनावट दस्तऐवज तयार करून हा कारखाना स्वतःच्या नावे करून पांडुरंग सोळुंके यांना बाजूला केले. पुढे 2013 साली याच कारखान्याच्या नावावर तासगावकर कुटुंबीयांनी 106 कोटी रुपयांच कर्ज पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि इतर दोन बँकांकडून घेतलं. मात्र बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर नंदकुमार तासगावकर आणि राजेश तासगावकर यांनी दहा ते पंधरा कोटी रुपये खर्च करून कारखान्याचे काम अर्धवट सोडलं आणि कारखाना दिवाळखोरीत निघाला.

ईडी आणि सीबीआयच्या ( ED CBI ) अधिकाऱ्यांची एन्ट्री शिवपार्वती साखर कारखान्याचे बनावट दस्तऐवज तयार करून कारखाना स्वतःच्या नावावर करून घेऊन, त्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार (PNB scam) केल्याप्रकरणी पांडुरंग सोळंके यांनी 2022 मध्ये बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. मात्र बीड पोलिसांनी ( Beed Police) याकडे दुर्लक्ष केल्यानंतर त्यांनी थेट एनसीएलटी आणि आरवोसी यांच्याकडे तक्रार केली. दरम्यान या कारखान्याचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाच ज्या बँकेकडून कर्ज घेण्यात आले, त्यांनी हा कारखाना लिलावात काढला. मात्र याचवेळी यात ईडी आणि सीबीआयच्या ( ED CBI ) अधिकाऱ्यांनी एन्ट्री केली आहे. आता यामध्ये नेमकी सोळंके किंवा तासगवकर यांची चौकशी होत आहे, याबाबत ईडी आणि सीबीआयच्या छाप्यानंतरच उघड होणार आहे. या कारवाईने कारखान्याशी संबधित लोकांमध्ये मात्र खळबळ उडाली आहे. छापेमारीनंतरची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!