ब्रेकींग न्युज… धारुर तालुक्यात सख्ख्या भांवाच्या दुचाकीचा अपघात; एक ठार, एक गंभीर.

किल्ले धारूर दि.10 मे – धारुर तालुक्यातील तेलगाव येथे दुचाकीवरुन जात असलेल्या दोन सख्ख्या भावावर काळ ओढावला. ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे.
तेलगाव येथे आज मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरने मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. आदित्य शंकर राठोड असे मयताचे नाव आहे.
बाबीतांडा येथून आदित्य व अभिजित शंकर राठोड हे सख्खे भाऊ मोटारसायकल वरुन तेलगावकडे येत असताना कलंत्री पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. यात आदित्य (वय 20) याचा जागीच मृत्यू झाला तर अभिजित शंकर राठोड (वय 22) गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर जखमीस जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
( Breaking News … Accident of number two brother’s bike in Dharur taluka; One kill, one serious. )