ब्रेकींग न्यूज… बीडच्या डॉक्टरचा पाचोडजवळ अपघात; दोघे गंभीर जखमी.

बीड दि.18 जुन – बीड जिल्हा रूग्णालयातील स्त्रीरोग तज्ञ आपल्या चार चाकी वाहनातून औरंगाबादला जात असताना पाचोडजवळ गाडीवर नियंत्रण सुटल्याने गाडीचा अपघात (Accident) झाला. गाडी रस्त्याच्या खाली जावून पलट्या मारल्याने डॉक्टरसह अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही औरंगाबादच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये (MGM Hospital) दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे.

डॉ.रामेश्वर आवाड असे जखमी डॉक्टरचे नाव आहे. डॉ.आवाड हे स्त्रीरोग तज्ञ म्हणून जिल्हा रूग्णालयात कार्यरत आहेत. आज दि.18 शनिवारी सकाळीच ते आपल्या चारचाकी वाहनाने औरंगाबादला (Aurangabad) जात होते. पाचोडजवळ त्यांचा गाडीच्या स्टेअरींगचा ताबा सुटला. यामुळे गाडी रस्त्याच्या खाली गेली. गाडीने पलटी मारल्याने गाडीचा चुरा झाला होता.

अपघातग्रस्त गाडीत डॉ.आवाड यांचे ओळखपत्र (Identity card) सापडले आहे. परिसरातील स्थानिक लोकांकडून मदत करुन सर्व जखमींची रुग्णालयात रवानगी करण्यात आली आहे. ते औरंगाबादला का जात होते आणि सोबत कोण होते हे मात्र कळू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे औरंगाबादकडे रवाना झाले आहेत.

( Breaking News … Beed doctor’s accident near Pachod; Both seriously injured. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!