ब्रेकींग न्यूज… अनिल देशमुख यांच्या नागपुर व मुंबईच्या घरावर ईडीची छापेमारी.

नागपुर/मुंबई दि.25 जून – माजी गृहमंत्री अनिल देखमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी (ED raids) केली आहे. अनिल देखमुखांच्या नागपुरातील घरावर ही छापेमारी करण्यात आली. यासोबतच देशमुख यांच्या मुंबई येथील ज्ञानेश्वरी बंगल्यावरही ईडीकडून छापेमारी सुरु झाल्याची माहिती पुढे येत आहे.

(Breaking News … ED raids Anil Deshmukh’s house in Nagpur and Mumbai.)

अनिल देशमुख यांच्या घरी ईडीकडून झडाझडती सुरू आहे. या तपासासाठी 6 ते 7 अधिकारी नागपुरातील देशमुखांच्या घरी तर मुंबई येथील ज्ञानेश्वरी बंगल्यावर 4 अधिकारी पोहोचले आहेत. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या घराबाहेर बंदोबस्तासाठी सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

100 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांच्या आरोपावरून अनिल देशमुख यांच्यावर ईडीनं गुन्हा दाखल केला होता. 25 मे रोजी अनिल देशमुखांशी संबंधित नागपुरातील तिघांकडे ईडीने चौकशी केली होती.

गुरूवारी ईडीकडून पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांची देखील याप्रकरणात चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज ईडीनं अनिल देशमुखांच्या घरावर छापा टाकला आहे. दरम्यान, अनिल देशमुख सध्या घरात नसून ते दौऱ्यावर असल्याचं कळत आहे. देशमुख कुटुंबीय घरात आहेत.

याआधी मे महिन्यात देखील अनिल देशमुखांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. यात महत्वाची कागदपत्रं जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. 100 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी आता अनिल देशमुखांवर झालेल्या आरोपानंतर ईडीच्या या छापेमारीमुळे (ED raids) त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!