बीड जिल्ह्याची स्थिती स्फोटक; बीड दिडशे, अंबाजोगाई,केज व माजलगाव मध्ये वाढ… धारुर 2… पहा तालुका निहाय आकडेवारी

बीड दि.21 मार्च- बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनास्थिती स्फोटक बनत चालली आहे. आज कोरोना बाधितांची संख्या तब्बल साडेतीनशेच्या जवळ पोहोचली आहे. आज बीड (Beed) जिल्ह्यातील 1708 प्राप्त अहवाला पैकी तब्बल 336 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून 1372 जण निगेटिव्ह आली आहेत. आज सोळाव्या दिवशी बीड तालुक्यात 158 कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहेत. बीड पाठोपाठ आज अंबाजोगाईत 71 रुग्ण आढळून आली आहेत. आज केज 20, वडवणीत 5, तर धारुरमध्ये 2 कोरोना बाधित आढळली आहेत.
(The situation in Beed district is explosive; Increase in Beed Didshe, Ambajogai, Cage and Majalgaon … Dharur 2 … See Taluka wise statistics)
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड- 158, अंबाजोगाई-71, आष्टी-18, धारुर-2, गेवराई- 8, केज-20, माजलगाव-23, परळी-15, पाटोदा-0, शिरुर-1, वडवणी-5
अशी आहे.
कोविड-19 (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.21 रविवारी जाहिर केली. बीड जिल्ह्यात आजची रुग्ण संख्या 336 वर आहे. बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्याची कोरोना स्थिती स्फोटक बनत आहे.
दरम्यान, शनिवारी राज्यात दिवसभरात 27 हजार नवीन कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण महाराष्ट्रात आढळळली आहे. महाराष्ट्र राज्य आशिया खंडात सर्वाधिक रुग्णांचा हॉटस्पॉट बनला आहे. पुण्यात मुंबई पेक्षा जास्त रुग्ण आढळून आली आहेत.