बीड जिल्ह्यात पुन्हा लाचखोरी; सिरसाळ्यात दोन पोलिसांसह एकास रंगेहात पकडले.

परळी दि.23 जून – राखेची वाहतूक करणारे पकडलेले टिप्पर सोडवण्यासाठी सिरसाळा पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांनी लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी दोन पोलीस (Police) कर्मचार्‍यांवर आज दि.23 बुधवारी कारवाई करण्यात आली. मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात लाचखोरीचे (Bribery) प्रमाण वाढले असल्याचे दिसून येत आहे.
(Bribery again in Beed district; One was caught red-handed with two policemen in Sirsala.)

परळी तालुक्यातील सिरसाळा (Sirsala) पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी गजानन येरडलवार व उमेश कन्कावर यांनी एका एजंटच्या मार्फत तक्रारदाराकडे राखेचे टिप्पर सोडवण्यासाठी सहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारदाराने उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी उस्मानाबाद एसीबीने (ACB) सापळा रचत कारवाई केली. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने जिल्हा पोलीस (Police) दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी लोकसेवक उमेश यशवंत कनकावार , वय 31 वर्ष, पद- 1 पोलीस शिपाई 1868, पोलीस स्टेशन, सिरसाळा (वर्ग 3), गजानन अशोक येरडलावर , वय 32 वर्ष, पद-पोलीस शिपाई 1869, पोलीस स्टेशन, सिरसाला (वर्ग 3) व नदीम मोसीन पठाण, वय 26 वर्ष, रा. पठाण गल्ली, सिरसाळा, ता. परळी, जि.बीड (खाजगी इसम) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचे राख वाहून नेणारे 3 हायवा गाडी पोलीस स्टेशन, सिरसाळा हद्दीतुन चालू देण्यासाठी यातील आरोपी लोकसेवक क्र. 1 व 2 यांनी 9, 000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 6,000 रुपये लाचेची मागणी करून आरोपी क्र.3 यांच्या मार्फतीने 6,000 रुपये सोनपेठ चौक, सिरसाळा येथे स्वीकारली.

सदरील कारवाई उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद, मारुती पंडित, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद, प्रशांत संपते — पोलीस उप अधीक्षक ला.प्र.वि. उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी, – श्री गौरीशंकर पाबळे , पोलीस निरीक्षक, ला प्र वि उस्मानाबाद यांनी सापळा पथक पोलीस अंमलदार मधुकर जाधव, विष्णू बेळे, विशाल डोके, अर्जुन मारकड, चालक/पो.अ. दत्तात्रय करडे यांनी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!