बीड जिल्ह्यात लाचखोरी वाढली….आता माजलगावचे उपविभागीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

माजलगाव दि.१९(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात लाचखोर अधिकाऱ्यावर एसीबीकडून वारंवार कारवाया होत असल्याचे दिसून येत आहे. काल दि.१८ गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास माजलगाव येथील उपविभागीय अधिकारी यांना वाळूची गाडी चालू द्यावी म्हणून ६५ हजाराची लाच ड्रायवर कडे देत असतांना जालना येथील लाच लुचपत अधिकाऱ्यानी रंगेहात पकडल्याची घटना घडली.

(Sub-divisional officers of Majalgaon are in the net of ACB)

माजलगाव तालुक्यात गोदावरी नदीतून वाळूचे अवैध उपसा मोठ्या प्रमाणावर होतो. यास वाळू माफियास पाठबळ देण्याचे काम काही स्वरूपात अधिकारी हे करत असतात. माजलगाव तालुक्यालगत वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पलीकडे जालना जिल्ह्याची हद्द सुरु होते. दोन्ही भागातून वाळूचा मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या उपसा होतो. हा अवैध उपसा होऊ द्यावा यासाठी वाळू माफिया हे अधिकाऱ्यांना सर्रास लाच देऊन आपले उखळ पांढरे करतात. त्याचाच भाग म्हणून या गोदावरी पात्रातून वाळूचा अवैधरित्या उपसा होऊ द्यावा म्हणून वाळू माफियांनी येथील उपविभागीय अधिकारी यांना सुमारे ६५ हजाराची लाच देऊ केली. हि लाच त्यांच्या ड्रायव्हर मार्फत संभाजी चौकात घेत असताना त्यांना गुरुवारी रात्री ९ वाजता पकडण्यात आले. सदरील कारवाई जालना येथील लाच पथकातील अधिकारी निकाळजे यांच्या पथकामार्फत करण्यात आली आहे तर सदरील प्रकरणी उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड व त्यांचा चालक यांना पुढील कार्यवाही साठी बीड येथे नेण्यात आले आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी आष्टी, वडवणी व केज येथेही लाचलूचपत विभागाने कारवाई करत अधिकाऱ्यांना जेरबंद केले होते. बीड जिल्ह्यात वारंवार घडणाऱ्या लाचखोरीच्या प्रकारामुळे जिल्हा भ्रष्टाचारात बरबटला असल्याचे दिसून येत आहे.
(Sub-divisional officers of Majalgaon are in the net of ACB)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!