स्मशानभूमी सौंदर्यीकरणासाठी लाच; उपअभियंता लाच स्विकारताना चतूर्भुज

बीडः दि.६- ॲन्टी करप्शन ब्युरो बीड (Anti-Corruption Bureau Beed) विभागाने दि.५ शनिवारी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील प्रभारी उपअभियंता नामदेव बहिर यास स्मशानभुमि सौंदर्यीकरणासाठी ८ हजार रुपयांची लाच (Bribe) स्विकारताना रंगेहात पकडले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदाराने दिलेल्या तक्रारी वरुन लोकसेवक नामदेव रामकिसन बहीर, वय 55 वर्षे, प्रभारी उप अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम, उप विभाग माजलगाव, जिल्हा परिषद बीड, वर्ग 2 रा. संत तुकाराम नगर, राजीव गांधी चौक, बीड याने लाचेची (Bribe) मागणी केली. सन 2018-19 मधील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत मौजे तालखेड ता. माजलगाव जि.बीड (Beed) येथील स्मशानभूमी सौंदर्यीकरण अंतर्गत शेड व शेड निवारा तयार करण्याचे काम पूर्ण करून केलेल्या कामाची मोजमापपुस्तीका (एम.बी.) वर सही करण्यासाठी मोबदला म्हणून लोकसेवक बहीर यांनी 12,000/- रुपये लाच (Bribe) रकमेची मागणी करून तडजोडी अंती 8,000/-रु. लाच रक्कम स्वीकारली. सदरील कारवाई लाचलुचपत विभाग बीड (Anti-Corruption Bureau Beed) पथकाने दि.५ रोजी सापळा रचून केली. डाॅ. राहुल खाडे पोलीस (Police) अधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद, डॉ.अनिता जमादार, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी बाळकृष्ण हनपूडे -पाटील, पोलीस (Police) उप अधीक्षक, व ला.प्र.वि.टीम बीड (Anti-Corruption Bureau Beed) यांनी ही कारवाई केली आहे.