डॉक्टरसह सात जणांची हकालपट्टी; आष्टी कोविड सेंटरमध्ये कारवाई.

बीड दि.22 मे – वाढत्या तक्रारी नंतर कोविड सेंटरमध्ये थांबून रूग्णसेवा करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्यांना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला आहे. एका डॉक्टरसह सात जणांची थेट हकालपट्टी करण्याची कारवाई आज शनिवारी पहाटेच अचानक भेट देऊन डीएचओ डॉ. आर.बी.पवार यांनी केली. या कारवाईमुळे कामचुकारांचे धाबे दणाणले आहेत.
(Expulsion of seven people, including a doctor; Action at Ashti Covid Center.)
आष्टी कोविड केअर सेंटरमधील रूग्ण बाहेर फिरतात, डॉक्टर, परिचारिका (nurses) उपचाराकडे दुर्लक्ष करतात, वॉर्डबॉय (Wardboy) स्वच्छता करत नाहीत, अशा तक्रारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यांनी याची गंभीर दखल घेत शनिवारी सकाळीच आष्टी गाठत कोविड केअर सेंटरची (Covid care center) तपासणी केली.
यात त्यांना भरपूर त्रूटी दिसुन आल्या. तसेच कामात हलगर्जीपणा झाल्याचेही दिसले. यावेळी क्षणाचाही विलंब न करता येथे कर्तव्यावर असणाऱ्या डॉ.माधूरी पाचरणे, या डॉक्टरसह अश्विनी पांतागणे, रूपाली काळे या दोन एएनएम आणि चार वॉर्डबॉयची (Wardboy) हकालपट्टी केली. तसेच दुसऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ बोलावून घेत रूग्णसेवा देण्याच्या सुचना प्र.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन मोरे यांना दिल्या. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात सध्या कोविड केअर सेंटर वर (Covid care center) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याचे दिसुन येते. धारुर येथील कोविड केअर सेंटरही सध्या तक्रारींचे माहेर झालेले आहे. येथील कोविड सेंटरवर कोणाचे नियंत्रण नसल्याचे दिसत आहे. डॉक्टर केवळ हजेरी लावत असल्याचे, रुग्णांचा सर्रास बाहेर वावर असणे, परिचारीकांचा (nurses) मगरुरपणाची वागणूक, अस्वच्छता अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. येथेही अशीच कारवाई होणे अपेक्षित असल्याच्या प्रतिक्रिया देत अनेकांनी डॉ. पवार यांच्या धडक कारवाईचे स्वागत केले आहे.