सख्ख्या भावाने केला बहिणीचा घात; केज तालुक्यातील खळबळजनक घटना.

केज दि.21 एप्रिल – ‌आईला पाडव्या निमित्त भेटायला आलेल्या बहिणीचा भावाने मित्राच्या मदतीने खून (Murder) केल्याची घटना केज तालुक्यातील बोरगाव येथे मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी केज पोलिसात भावासह त्याच्या मित्रा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(brother killed his sister; Sensational incident in Kaij taluka.)

‌पुणे येथून केज तालुक्यातील बोरगाव येथे आईला पाडव्याच्या सना निमित्त भेटण्यास शितल लक्ष्मण चौधरी या आपल्या मुलीला घेऊन बोरगाव येथे आली होती. मात्र मंगळवारी मध्यरात्री तिचा खून (Murder) झाल्याचे उघड झाले. सख्खा भाऊ दिनकर उर्फ दिनु गोरख गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर दोन्ही रा.बोरगाव यांनी अज्ञात कारणावरून शितल हिच्या डोक्यात हत्याराने वार करून तिचा खून केला. या प्रकरणी मयताच्या चुलत भाऊ नानासाहेब जालींदर गव्हाणे यांने दिलेल्या फिर्यादी वरून केज पोलिस (Police) ठाण्यात दिनकर उर्फ दिनु गोरख गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर दोन्ही रा.बोरगाव यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‌घटनेची माहिती मिळताच केज पोलिस (Police) ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या सह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ‌या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन करत आहेत. दरम्यान, सख्ख्या बहिणीचा खुन केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरु केला असून सख्ख्या भावाने बहिणीचा खून का केला हे पोलिस तपासात निष्पन्न होईल अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!