बीड

BSNL Tower धारुरमध्ये बीएसएनएल टॉवर कोसळले ; तीन बालिकांसह दोघे जखमी.

61 / 100 SEO Score

किल्लेधारुर दि.11 (वार्ताहर) BSNL Tower शहरातील संभाजीनगर झोपडपट्टी भागात उभारलेला बीएसएनएल टॉवर आज दि.11 मे रोजी सांयकाळी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे कोसळले असून यात एका कुटूंबातील तीन बालिकांसह दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की किल्लेधारुर शहरात संभाजी नगर झोपडपट्टी भागात जवळजवळ तीस वर्षापूर्वी बीएसएनएलकडून एसटीडी सेवेसाठी टॉवर उभारण्यात आले होते. सदर टॉवर मात्र अद्यापही बंद अवस्थेत होते. सदरील टॉवरकडे बीएसएनएल विभागाचे संपूर्ण दुर्लक्ष असल्याने टॉवरचे एक एक भाग यापुर्वीही कोसळत असतं. याबाबत प्रसार माध्यमातून अनेक वेळा वृत्त प्रसारीत करुन दुरसंचार विभागाला कळवण्यात आले होते. याभागात शिकलकरी समाजाची घरे असून त्यांच्या जिवितास धोका असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते. आज अचानक आलेल्या वादळी पावसामुळे सदर टॉवर जमीनदोस्त झाले असून सदर टॉवरचा काही भाग राहत्या घरावर पडल्यामुळे एका कुटूंबातील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीत राधा कौर (8 वर्ष), पुनम कौर (6 वर्ष), दस्मित कौर (5 वर्ष), गंगा कौर (22 वर्ष), योगिंदरसिंग (25 वर्ष) यांचा समावेश आहे. जखमीनां येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेचे डॉक्टर अरविंद निक्ते व कर्मचारी सुरेश सावंत यांनी प्रथमोपचार करीन अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तीर्थ रूमालयात रवाना केले. दरम्यान शहर परिसरात वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे उनमळून पडली असून शहरात एक हायमास्ट दिवाही पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!