घात-अपघात

Bus accident … बसने मोटारसायकल स्वारास चिरडले ; धारुर शहरालगतची घटना.

61 / 100 SEO Score

किल्लेधारुर दि.1 अॉक्टोंबर – Bus accident धारुर Dharur शहरालगतच एस.टी. महामंडळाच्या बसने एका मोटारसायकल स्वारास चिरडल्याची घटना दुपारी घडली. यात मोटारसायकल स्वार ठार झाला असून दुचाकीचा चेंदामेंदा झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कळंबहून माजलगावकडे जाणाऱ्या बसने (क्र.एमएच 14 बीटी 2534) धारुरहून मैंदवाडीकडे जात असलेल्या दुचाकीस्वाराला समोरासमोर धडक दिली. धडक इतकी जबर होती की मोटारसायकल (क्र.एमएच 44 जे 9207) व दुचाकी चालक थेट बसच्या खाली मधोमध अडकले. यात मोटारसायकल चालक चंद्रभान भगवान मैंद रा. मैंदवाडी ता.धारुर Dharur (अंदाजे वय 52) जागीच ठार झाला. तर दुचाकीचे अक्षरशः तुकडे झाले. पोलिसांना Police अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक गोविंद बाष्टे पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!