सोमवार पासून पुन्हा बससेवा बंद; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय.

सोमवार पासून बससेवा बंद; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय.
परभणी दि.27 जून – परभणी जिल्ह्यातील प्रवासी बससेवा बंद करण्याचा निर्णय परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर (Collector Dipak Muglikar) यांनी घेतला आहे. सोमवार पासून 3 जूलैपर्यंत ही सेवा बंद राहणार आहे. यामुळे परभणी जिल्ह्यात इतर कोणत्याही जिल्ह्यातून बस धावणार नाही.
(Bus service closed from Monday; Collector’s decision.)
सध्या महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना नवीन डेल्टा प्लस व्हेरिअंटची (Delta plus variant) दहशत आहे. लसीकरण होवूनही डेल्टा व्हेरिअंटचा संसर्ग होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे राज्य सरकारने राज्यातील सर्वच जिल्ह्यांना तिसरा व त्यावरील स्तरात समाविष्ट करत तिसऱ्या स्तरासाठीचे निर्बंध (restrictions) लागू केले आहेत.
परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर (Collector Dipak Muglikar) यांनी दि.26 जून रोजी रात्री याबाबत नवीन आदेश काढत जिल्ह्यात नव्या मार्गदर्शक सुचना (guidelines) जाहिर केला. यात जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तसेच खाजगी वाहतूक ट्रॕव्हल्स बसेस दि.3 जूलै पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सोमवार पासून परभणी जिल्ह्यातील एसटी बस (ST Bus) सेवा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा विभाग नियत्रकांनी घेतला आहे.
बीडहून परभणीच्या फेऱ्या बंद.
बीड जिल्ह्यातील सर्व आगारातून परभणी जिल्ह्यात जाणाऱ्या सर्व बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील परभणी जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाणाऱ्या बसेसनांही याचा फटका बसणार आहे. याबाबत बीडचे विभाग नियंत्रक कालिदास लांडगे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी परभणीची प्रवासी सेवा दि.3 जूलैपर्यंत बंद करण्यात येत असल्याचे सांगितले.
धारुर-अकोला बस हिंगोलीहून परतली.
आज धारुर आगारातील परभणीहून अकोला येथे जाणारी बस (ST Bus) हिंगोलीहून परत बोलावण्यात आली. याबाबत धारुर आगार व्यवस्थापक शंकर स्वामी यांच्याशी विचारपूस केली असता सदरील शेड्यूल्ड हे मुक्कामी असून परभणीत बससेवा बंद होत असल्यामुळे हिंगोलीहून सदरील बस परत बोलावण्यात आल्याची माहिती दिली.