औरंगाबाद व उस्मानाबादच्या नामांतरास मंत्रिमंडळाची मंजूरी ; बीडसाठीही महत्त्वाचा निर्णय.

49 / 100

मुंबई दि.29 जुन – आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद व उस्मानाबादच्या नामांतरास मंत्रिमंडळाची मंजूरी देण्यात आली आहे. याशिवाय नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

एकीकडे महाविकास आघाडी सरकारचा फैसला उद्या बहुमतानंतर होणार असताना आज दि.29 मंगळवारी कॅबिनेटची बैठक झाली. विशेष म्हणजे 24 तासात राज्य मंत्रिमंडळाची ही दुसरी बैठक झाली आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे ( Aurangabad ) नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचे ( Osmanabad ) नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला (Navi Mumbai International Airport) दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) स्वतः आजच्या बैठकीसाठी मंत्रालयात उपस्थित होते.

आजच्या बैठकीत महत्त्वाचे दहा निर्णय घेण्यात आले आहेत. यात औरंगाबाद शहराच्या “संभाजीनगर” नामकरणास मान्यता, उस्मानाबाद शहराच्या ‘धाराशीव” नामकरणास मान्यता, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता. राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार. हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार.

कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार, अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार, ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार. विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ ही विकास मंडळे पुनर्गठीत करण्याचा निर्णय. निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय व शासन अधिसुचना ८ मार्च २०१९ अनुसार आकारावयाच्या अधिमुल्याची रक्कम भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

( Cabinet approval for renaming of Aurangabad and Osmanabad; An important decision for Beed as well. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!