धारुरजवळ अंबेवडगाव येथे कार व ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक ठार

किल्लेधारूर दि.४(प्रतिनिधी) – धारुर तालुक्यातील अंबेवडगाव येथे कार व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला. या अपघातात (Accident) एक जण जागिच ठार झाल्याची माहिती मिळाली असून सदरील पहाटे 3 च्या सुमारास घडला.
(Car and tractor accident at Ambewadgaon near Dharur; One killed)
राष्ट्रीय महामार्ग 548 सी खामगांव सांगोला रस्त्यावर अंबेवडगाव येथे असलेल्या ट्रक ले बायपास जवळ हा अपघात (Accident) घडला. कार क्र.एम.एच. 11 बी.बी. 0102 व ऊस घेवून जाणाऱ्या ट्रॅक्टर ची समोरासमोर धडक झाली. धारुर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही.
अपघातातील मयत तरुण हा धारुर तालुक्यातील काटेवाडीचा असल्याचे कळते. अपघात पहाटे 3 वाजता घडला आहे.