Car bike accident … धारुरच्या ‘त्या’ अपघातात केजचा तरुण ठार; एकाची प्रकृती चिंताजनक.

किल्लेधारुर दि.20 सप्टेंबर – Car bike accident धारुर तालुक्यातील चोरांबा येथे दि.19 मंगळवारी भरधाव कारने दुचाकीला उडवून झालेल्या अपघातातील Accident एका तरुणाचे उपचार सुरु असताना निधन झाले तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
धारुर Dharur शहरापासून जवळच असलेल्या चोरांबा या गावात राष्ट्रीय महामार्ग क्र 548 सी या रस्त्यावर काल मंगळवारी (दि.19) भीषण अपघात झाला. चोरांबा येथील हॉटेल राधिका समोर धारुरकडे भरधाव वेगात जाणाऱ्या स्विफ्ट कारने (क्र. एमएच 08 एएन 2460) धारुरहून तेलगावकडे जात असलेल्या दुचाकीला (क्र. एमएच 44 एफ 2385) जोरात धडक दिली. या अपघातात Accident दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले होते. सदर अपघातातील दोन्ही तरुण केज तालुक्यातील नागझरी येथील असल्याचे समोर आले. पाथरी तालुक्यातील आपल्या शेतजमीनीकडे जात असताना हा अपघात झाला. दोन्ही तरुण नात्याने चुलत भाऊ आहेत. अपघातानंतर उपचारासाठी दोघांना अंबाजोगाई येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. यातील श्रीहरी रामकिसन चौरे (वय 38) याचे उपचार सुरु असताना निधन झाले तर दत्तात्रय नवनाथ चौरे (वय 30) यांच्यावर उपचार सुरु आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर नागझरी गावात शोकाकूल वातावरण निर्माण झाले. मयत श्रीहरीवर मरदसगाव ता. पाथरी येथे बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.