खा.संभाजीराजे यांच्या उपस्थितीत झालेल्या सामुहिक विवाह सोहळ्यावर माजलगावात २५ जणांवर गुन्हा नोंद….

माजलगाव दि.२२(प्रतिनिधी) माजलगाव येथील शिवप्रतिष्ठाण आयोजित सामुहिक विवाह सोहळ्यात कोरोना नियमांचा फज्जा उडाल्यामुळे पोलिसांनी २५ जणांवर माजलगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यास खा. संभाजीराजे भोसले (Sambhajiraje Bhosle) व माजी मंत्री राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांची उपस्थिती होती.
(Crime recorded against 25 persons in Majalgaon on the occasion of mass marriage ceremony held in the presence of MP Sambhaji Raje ….)
सात वर्षांपासुन माजलगाव येथील शिव प्रतिष्ठाण संस्था समाजातील गोरगरीब व निराधार मुलींच्या सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करते. यावर्षीही हा सामुहिक विवाह सोहळा कोविड-१९ (Covid-19) च्या सर्व नियमांचे पालन करत आयोजित करण्यात आले होते. मात्र हजारोंच्या उपस्थितीने कोरोना नियमांचा फज्जा उडाला. कोरोना (corona) विषयक मास्क, सोशल डिस्टंटींग चा नियम मोडित निघाल्याने माजलगाव शहर पोलिसांनी २५ जणांवर गुन्हा नोंदवला.
या विवाह सोहळ्यासाठी खा. संभाजीराजे भोसले व माजी मंत्री राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) उपस्थित होते. यावेळी आ.सोळंके व खा.संभाजीराजे यांनी मनोगत व्यक्त करताना कोरोना (corona) बाबत लोकांना स्वतःची काळजी घेण्याचे व कोव्हिड (Covid-19) नियम पाळण्याचे आवाहन केले.
खा.संभाजीराजेंची धारुरला धावती भेट-
खा. संभाजीराजे (Sambhajiraje Bhosle) माजलगावकडे जात असताना किल्लेधारूर येथे धावती भेट दिली. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार करत येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितिन शिनगारे, ॲड. सय्यद साजेद, पत्रकार अतुल शिनगारे, सुरेश फावडे, बापु खामकर, शेख अक्रम, अनंता भोसले, नगरसेवक बाळासाहेब सोनटक्के, बालाजी चव्हाण, विश्वास शिनगारे आदी उपस्थित होते.