माझं गाव

धारुरकरांसाठी महत्त्वाची बातमी… काय म्हणाले आढावा बैठकीत आ. सोळंके …?

किल्ले धारूर दि.20 मार्च- धारूरकरांसाठी महत्त्वाची असणारी कुंडलिका पाणी पुरवठा योजना येत्या तीन महिन्यात मार्गी लावून धारूरकरांना जून महिन्यापर्यंत कुंडलिका धरणावरून पाणीपुरवठा होईल अशी माहिती आ. प्रकाशदादा सोळंके (Prakash Solanke) यांनी धारूर शहराचा विकास आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत (Press) बोलताना दिली.

धारूर नगरपालिकेमध्ये आ. प्रकाश सोळंके यांच्या उपस्थितीमध्ये नगर परिषदेची विकास कामाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला नगर परिषदेच्या प्रशासक तथा उपजिल्हाधिकारी श्रीमती बाफना, मुख्याधिकारी विशाल भोसले, जि प चे सभापती जयसिंह सोळंके, माजी नगराध्यक्ष माधवराव निर्मळ, जिल्हा सरचिटणीस सय्यद शाकेर, राष्ट्रवादीचे (NCP) शहर अध्यक्ष नितीन शिनगारे, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सिरसट, युवानेते सुधीर शिनगारे व नगर परिषदेचे विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

शहरातील न. प. (Municipal Council) च्या आढावा बैठकी नंतर आमदार प्रकाश सोळंके यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शहराच्या विकासासाठी अडीच कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केल्याचे सांगितले. हा निधी सामाजिक सभागृह व रस्ते यांच्या कामासाठी हा खर्च करण्यात येणार असल्याचेही सांगितले. धारूर बस स्थानकाच्या संरक्षण भिंतीसाठी न. प.कडून नाहरकत देण्यात यावी अशा सूचना केली.

नाट्यगृहाची इमारत न.प.कडे हस्तांतरित करणे व न.प.च्या नवीन इमारतीचे काम लवकरात लवकर करण्यात यावे अशाही सूचना त्यांनी केल्याचे सांगितले. रमाई घरकुल व पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना राहिलेल्या हप्त्याचे वाटप तात्काळ करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. मागील अनेक वर्षापासून सुरु न होऊ शकलेल्या कुंडलिका पाणीपुरवठा योजनेचे काम हे पुढील तीन महिन्यात पूर्ण करून जुन महिन्यापर्यंत या योजनेचे पाणी सुरू होईल असे आ. सोंळके यांनी सांगीतले.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते माधवराव निर्मळ यांनी ऐनवेळीच्या विषयात महत्वाचा विषय म्हणून शहराच्या हद्दीतील सर्व समाजाच्या स्मशानभुमीच्या नोंदी घेण्याची सुचना केली. शहरातील स्वच्छता विषय, स्लॉटर हाऊस, घनकचरा व्यवस्थापन आदी विषयावर सुचना करण्यात आल्या. यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोकराव डक, संजीत कोमटवार, सय्यद हारून, आवेज खुरेशी, सोमनाथ शेळके, प्रदीप नेहरकर, विश्वास शिनगारे, सुनिल कावळे, गणेश सावंत, ज्ञानेश्वर शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.
(  Important news for Dharurkar … What did MLA Prakash Solanke say in the review meeting …? )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!