माझं गाव

100 टक्के उपस्थितीचा केंद्राचा आदेश; धारुरमध्ये मात्र अधिकाऱ्यांची दांडी यात्रा.

किल्लेधारूर दि.9 नोव्हेंबर – कोविड नियमावलीत (Covid guidelines) केंद्र शासनाने 8 नोव्हेंबर पासून बदल करुन आता सर्व कार्यालयात पुर्ण क्षमतेने कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश काढले आहेत. तसेच हजेरी नोंदवण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी (Biometric Attendance) प्रणाली पूर्ववत करण्यात आली आहे. मात्र धारुर येथील तहसील कार्यालयात दि.8 नोव्हेंबर सोमवार रोजी सर्वच अधिकारी गैरहजर असल्याचे छायाचित्रे सोशल मेडीयात (Social Media) व्हायरल झाली असून यामुळे चांगलीच चर्चा रंगली आहे.

(Central Government Order of 100 Percent Attendance; In Dharur, however, the Dandi Yatra of the officers.)

धारुर (Dharur) येथील तालुक्याचे प्रमुख प्रशासकीय कार्यालय असलेले तहसील कार्यालय समाज माध्यमात चर्चेचा विषय ठरला आहे. ऐरवी या ना त्या कारणाने चर्चेत असणारे अधिकारी दि.8 सोमवारी कार्यालयात आलेच नसल्याचे सांगितले जात आहे. सोमवार हा आठवड्याचा पहिलाच दिवस आहे. दिवाळीच्या (Diwali) सुट्ट्या संपल्यामुळे अनेकांना तहसील कार्यालयात विविध प्रमाणपत्रासाठी गर्दी केली होती.

परंतू तहसील कार्यालयात तासन तास बसुनही तहसीलदारासंह नायब तहसीलदार, अव्वल कारकुन व कारकुन गैरहजर असल्याचे दिसून आले. सदरील रिकाम्या खुर्च्यांची फोटो समाज माध्यमातून व्हायरल झाली असून विविध प्रश्न उपस्थित केली जात आहेत. तहसील कार्यालयासह इतर कार्यालयातही असाच प्रकार दिसत असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.

तहसील कार्यालयाच्या या परिस्थितीमुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. नुकताच नीटचा (NEET) निकाल लागला असून वैद्यकीय प्रवेश पात्र विद्यार्थी व पालकांनी आवश्यक प्रमाणपत्रासाठी प्रतिक्षा करावी लागली. निराधार योजनेचे मंजुरीपत्र घेण्यासाठी काहींची उपस्थिती होती. मात्र रिकाम्या खुर्च्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. सदरील प्रकारामुळे अनेक संघटनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्याची शक्यता आहे.

माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके (Prakash Solanke) यांनी काही दिवसांपुर्वीच तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली होती. मात्र याचा काहीच परिणाम झाला नसल्याचे सदरील प्रकारावरुन दिसून येत आहे. राज्यातील कोविड परिस्थिती सुधारली असून राज्य शासनाने सर्व नियमांत शिथिलता दिली आहे. असे असतानाही शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांची दांडी यात्रा कोणाचेही अंकुश नसल्याचा पुरावाच ठरत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!