‘कोरोना’ पाठोपाठ ‘बिबट्या’ही कमबॕक… पाथर्डी तालुक्यात झाले बिबट्याचे दर्शन

अहमदनगर दि.२७ फेब्रुवारी- गतवर्षी जगभर दहशत माजवणारा कोरोना (corona) पुन्हा सक्रिय झाला असून या पाठोपाठ अहमदनगर व बीड जिल्ह्यात धूमाकुळ घालणाऱ्या बिबट्या चेही कमबॕक झाले आहे. गेल्यावर्षी कोरोनाने जगभर तर नरभक्षक बिबट्याने (Leopard) अहमदनगर व बीड जिल्ह्यात दहशत माजवली होती.

(After ‘Corona’, ‘Leopard’ is a comeback … Leopard was seen in Pathardi taluka)

गेल्या काही महिन्यापुर्वी बीड व अहमदनगर जिल्ह्यात धुमाकूळ घालून अनेकांचा बळी घेणाऱ्या बिबट्याला अखेर गोळ्या  घालून ठार करण्यात आले होते. यानंतर पुन्हा पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील मढी येथील डोंगररांगेत आणखी एका बिबट्याने दर्शन दिल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. बिबट्या (Leopard) मढी परीसरात आला होता. मात्र तो मच्छद्रिंनाथ गडाकडे गेल्याचे ठसे मिळाले आहेत. वनविभागाने मढी, शिरापुर व घाटशिरस या भागातील नागरिकांना याबाबत सतर्क केले असून या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्याचे काम वनविभागाचे (Forest Department) अधिकारी व कर्मचारी करीत आहेत.

काही महिन्यांपूर्वी पाथर्डी तालुक्यातील मढी, शिरापुर व केळवंडी येथील तिन बालकांचे प्राण घेणाऱ्या त्या बिबट्याच्या आठवणी ताज्या असतानाच आता परत मढी येथील साळवे वस्तीशेजारी बुधवारी सायंकाळी विजय साळवे यांनी बिबट्याला पाहीले. यापूर्वीही बिबट्याने साळवे वस्तीवर हल्ला करुन एका मुलीचे प्राण घेतलेले आहे. याबाबत वनविभागाच्या (Forest Department) अधिकाऱ्यांना माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाकडून साळवे वस्तीवर जाऊन पाहणी करण्यात आली.

वनविभागाच्या पथकाला पाहणी दरम्यान तेथे बिबट्याचे ठसे आढळुन आले आहेत. बिबट्या डोंगराच्या दिशेने वरती गेल्याच्या पाऊल खुणा आढळून आल्या आहेत. वनविभागाने या भागात पिंजरे लावले आहेत. मढी, शिरापुर व घाटशिरस या भागातील नागरिकांना याबाबत रात्रीच्या वेळी बाहेर पडु नका असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!