बळींची शृंखला सुरुच, शुक्रवारी 2 मृत्यू; पहा नवीन कोरोना बाधितांची संख्या;

बीड दि.9 अॉक्टोबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज गुरुवारी 1903 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 34 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1869 जण निगेटिव्ह आली आहेत. जिल्ह्यात चिंतेची बाब म्हणजे कोरोना मृत्यूची शृंखला सुरुच आहे. बुधवारी 4, गुरुवारी 2 तर शुक्रवारी 2 मृत्यूची नोंद झाली आहे.

(Chain of victims continues, 2 deaths on Friday; See the number of new corona infestations)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-3, अंबाजोगाई-6, आष्टी-11, धारुर-3, गेवराई-4, केज-0, माजलगाव-3, परळी-1, पाटोदा-3, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्येत दोन दिवसात वाढ झाली आहे. कोरोना मृत्यूचे सत्र सुरुच आहे. बुधवारी (दि.6) जिल्ह्यात कोरोना उपचार घेत असलेल्या 4, गुरुवारी (दि.7) 2 तर शुक्रवारी दोघांनी आपला जीव गमावला आहे. गेल्या तीन दिवसात तब्बल 8 कोरोना बळींची नोंद झाली. जिल्ह्यातील एकुण मृत्यूची संख्या आता 2782 झाली आहे.

दरम्यान, राज्यात आज 2 हजार 620 नवीन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 943 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 97 हजार 018 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के आहे.

राज्यात आज 59 कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा झाला आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 33 हजार 11 सक्रीय रुग्ण आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!