बीड जिल्ह्यात आज पावनेचारशे; धारुरमध्ये 12 तर केज 27; गेवराई, माजलगाव व परळीतही वाढ

बीड दि.27 मार्च- बीड जिल्ह्यात आज पुन्हा पावनेचारशे रुग्ण आढळून आली आहेत. काल 383 तर आज 375 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे. आज बीड (Beed) जिल्ह्यातील 2713 प्राप्त अहवाला पैकी 375 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून 2338 जण निगेटिव्ह आली आहेत. आज बाविसाव्या दिवशी बीड तालुक्यात 112 कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहेत. धारुरमध्ये 12 तर केजमध्ये 27 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले.

(Three hundred and seventy five in Beed district today; 12 in Dharur and 27 in Kaij; Increase in Gevrai, Majalgaon and Parli)

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-112, अंबाजोगाई-75, आष्टी-30, धारुर-12, गेवराई-24, केज-27, माजलगाव-25, परळी-38, पाटोदा-23, शिरुर-4, वडवणी-5
अशी आहे.

कोविड-19 (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.27 शनिवारी जाहिर केली. बीड जिल्ह्यात आजची रुग्ण संख्या 383 वरुन 375 वर आली आहे. बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने जाहिर केलेल्या 10 दिवसांच्या लॉकडाऊनचा आज दुसरा दिवस आहे.

दरम्यान, गुरुवारी राज्यात दिवसभरात 37 हजारावर नवीन कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण महाराष्ट्रात आढळली आहेत. तर देशात 62 हजारावर कोरोना बाधित रुग्ण आढळली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!