पुजा चव्हाण प्रकरणी चित्रा वाघ यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे चौकशीचे संकेत….

मंत्री संजय राठोड अडचणीत

मुंबईः दि.१३- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी थेट मंत्री संजय राठोड हेच पुजा चव्हाण यांच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप केला. चित्रा वाघ यांनी एक व्हीडिओ ट्विट करुन संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Udhav Thankre) यांच्या कडून चौकशीचे संकेत येत आहेत. यामुळे मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) अडचणीत येण्याची शक्यता राजकीय वर्तूळातून वर्तवली जात आहे.

परळी येथील टिकटॉक स्टार पुजा चव्हाण (Pooja Chavan) हिने केलेल्या आत्महत्येनंतर सोशल मेडियात (Social Media) अनेक व्हाईस क्लीप व्हायरल झाल्या होत्या. आतापर्यंत अंधारात असलेल्या मंत्र्यांचे नाव भाजपाच्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी जाहिर करत या आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. पुजा चव्हाण हिच्या कुटूंबियांनी मात्र कसलीही तक्रार केली नसल्याने पोलिसांसमोर मार्यादा आलेल्या आहेत. याबाबत वाघ यांनी कुटूंबियांवर दबाव असण्याची शक्यता वर्तवत पोलिसांनी सदसदविवेकबुद्धी शाबूत ठेवून, सुमोटो अंतर्गत हा गुन्हा दाखल करायला हवा. या फोटोज, ऑडिओ क्लिप्सना गेले दोन दिवसापासून वेगवेगळ्या माध्यमातून येणाऱ्या बातम्या, सोशल मीडियातून (Social Media) येणाऱ्या बातम्या यांचा थेट रोख शिवसेनेचे मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याकडे आहे. यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे असा आग्रह धरला. भाजपने शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन आरोप केला असल्याने आता या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thankre) हे त्या मंत्र्यांची चौकशी करणार असल्याच्या हालचाली सुरु झाल्याचे कळते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!