मुख्यमंत्र्यांचा अल्टीमेटम… लॉकडाऊन बाबत दिले हे संकेत… उद्यापासून ही असेल बंदी

मुंबईः दि.२१- राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील लोकांना वेळीच नियम पाळा नसता आठवडाभरानंतर लॉकडाऊनचा निर्णय घेण्याचा अल्टीमेटम दिला आहे. आज कोरोना पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी हा इशारा दिला. यावेळी उद्या पासून राज्यातील सर्व धार्मिक, सामाजिक, राजकीय व गर्दी करणाऱ्या कार्यक्रमांना बंदीची मोठी घोषणा त्यांनी केली.
(Chief Minister’s ultimatum … This is a signal about lockdown … It will be banned from tomorrow)
महाराष्ट्रात कोरोनाची लाट आलीय की नाही हे पुढच्या आठ पंधरा दिवसांत कळेल, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) म्हणाले. “जर यावेळी काळजी घेतली नाही तर लॉकडाऊन (Lockdown) पुन्हा लावावा लागेल आणि यावेळी (अंमलबजावणी) अवघड असेल,” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) यांनी जनतेला दिला आहे. लॉकडाऊनबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “लॉकडाऊन करावा का? मी तुम्हाला विचारतोय. याचं उत्तर मी पुढचे ८ दिवस घेणार आहे. ज्यांना लॉकडाऊन (Lockdown) हवा ते विना मास्क फिरतील. त्यामुळे सूचना पाळा आणि लॉकडाऊन टाळा.” महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा वाढू लागल्यानं सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येतेय. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे आज दि.२१ रोजी सांयकाळी ७ वाजता जनतेशी संवाद साधला.
महत्त्वाचे मुद्दे :
पुढच्या महिन्यात कोरोना (Corona) येऊन एक वर्ष होईल
जनतेशी आपल्यावर विश्वास असण्याला नशीब लागतं
दिलासादायक गोष्ट म्हणजे लस आपल्या हातात आहे
९ लाखांच्या आसपास कोव्हिडयोद्ध्यांना लस
लशीमुळे कोणतेही घातक साईडइफेक्ट्स आढळले नाहीत
सर्वसामान्य लोकांना लस कधी मिळणार, हे केंद्र सरकार ठरवतोय
कोव्हिड योद्ध्यांनो, आपण सैनिक आहात, तुम्ही बेधडकपणे जाऊन लस घेऊन या
कोरोनासोबत आपण युद्ध लढतोय, पण हे युद्ध लढताना औषधरुपी तलवार आली नाहीय, त्यामुळे मास्करुपी ढाल आपल्याकडे हवी
लस घेण्याआधी आणि नंतरही मास्क घालणं हे अनिवार्य आहे
पूर्वी महाराष्ट्रात २ टेस्टिंग लॅब होत्या. आता ५०० च्या वर आहेत
राज्यात पुन्हा कोरोना (Corona) डोकं वर काढतोय. राज्यात लाट आलीये की नाही हे ८-१५ दिवसांत कळेल.
आपल्याला वाटलं कोरोना गेला. मास्क लावणाऱ्यांना मूर्ख म्हटलं गेलं. कोरोनाची लाट वर जाते, खाली येते. ती खाली येते, तेव्हा तिला थांबवायचं असतं.
पाश्चिमात्य देशांमध्ये आता पुन्हा लॉकडाऊन आहे.
कोरोनाची स्थिती पाहून मंत्री नितीन राऊत यांनी मुलाचा लग्न सोहळा रद्द केला
लग्नाच्या हॉलमध्ये नियम मोडले तर कारवाई होणार
मी जबाबदार ही नवीन मोहिम
सगळ्या गोष्टी आपल्याला सुरू पाहिजेत, पण त्या सुरू करताना शिस्तीची गरज आहे
अर्थचक्राला गती देत असताना पुन्हा कोरोनाचं संकट आलं
कोव्हिड योद्धे झाला नाहीत तरी कोव्हिड दूत होऊ नका
अमरावतीत परिस्थिती वाईट आहे
हात जोडून विनंती. पुन्हा बंधन पाळावी लागतील
सर्व राजकीय पक्षांना विनंती की, आपण आपल्यापासून सुरुवात करुया. उद्यापासून सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम, गर्दी करणारी आंदोलनं यांना काही दिवस बंदी आणत आहोत
सगळ्यांना पक्ष वाढवायचं आहे, पण आपल्याला पक्ष वाढवूया, कोरोना वाढवायचा नाहीय
मास्क घाला आणि लॉकडाऊन टाळा, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा
कोरोना विरोधात वर्ल्डवॉर सुरु
अमरावतीत चिंताजनक परिस्थिती
वरील महत्वाच्या मुद्यासह मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आठवडाभरानंतर परिस्थिती नुसार लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले आहेत. यावेळी सर्व राजकीय आंदोलन, गर्दी करणारे मोर्चे, मिरवणूक व धार्मिक कार्यक्रमांना बंदी उद्या पासून राहणार आहे.