भाजप नेत्या चित्रा वाघ अडचणीत; पीडीत तरुणीचा गोव्यात डांबून ठेवल्याचा वाघ यांच्यावर आरोप…

मुंबई दि.12 एप्रिल – भाजप नेत्या चित्रा वाघ सध्या अडचणीत आल्या असून शिवसेना नेते (Shivsena Leader) रघूनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा आरोप (Rape Case) करण्याच्या प्रकरणी आता कलाटणी घेतली आहे. या प्रकरणातील पीडीतेने चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले असल्याने चित्रा वाघ अडचणीत सापडल्या आहेत.

चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यात शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप करत चित्रा वाघ यांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच पीडित तरुणीच्या बचावासाठी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी वारंवार सांगितलं होतं. मात्र आता या प्रकरणाला वेगळच वळण मिळालं आहे.

रघूनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे (Rape) आरोप करणाऱ्या पीडीत तरुणीने चित्रा वाघ यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. मला बळजबरीने पोलिसांना जबाब देण्यासाठी चित्रा वाघ यांनी भाग पाडल्याचं तरुणीने माध्यमासमोर म्हटलं आहे. यामुळे खळबळ उडाली असून आता या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.

काय आहे पीडीत तरुणीचं म्हणनं…
तरुणीने म्हटलं की, चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी माझ्यावर दबाव टाकत आरोप करण्यास सांगितलं. माझ्या मोबाईलमधून ऍपच्या मदतीने मेसेज पाठविण्यात आले. तसेच चित्रा वाघ यांनी आपल्याला गोव्यात डांबून ठेवले होते, असा गंभीर आरोप तरुणीने केला आहे. दरम्यान, भाजपच्या एका व्यक्तीने आपल्याला एक पत्र आणून दिलं आहे. हे पत्र पोलिसांना (Police) देण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात येत असल्याचं तरुणीने सांगितलं.

मागील पाच ते सहा दिवसांपासून राज्याच्या राजकारणात भाजप नेते (BJP Leader) किरीट सोमय्या (Kirit Samayya) आणि वकील गुणरत्न सदावर्ते ( Adv Gunratna Sadavarte) सतत चर्चेत आहेत. सरकारला अडचणीत आणणारे दोन्ही नेते आता स्वत:च अडचणीत आले आहेत. यातच आता भाजपच्या फायरब्रँड नेत्या चित्रा वाघ अडचणीत सापडल्या आहेत.

याप्रकरणी चित्रा वाघ यांनी एखाद्या पीडीतेला मदत करणे चुकीचे आहे का ? असा प्रश्न माध्यमासमोर उपस्थित करत कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगितले. तर विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोरे (Nilam Gore) यांनीही या प्रकरणात चौकशी करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

( Chitra Wagh in trouble; Tiger accused of keeping young victim in Goa … )

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!