माझं गाव

Collector Deepa Mudhol जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या धारुर तालुक्यात भेटी.

48 / 100

किल्ले धारूर दि.19 एप्रिल – नवनियुक्त जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी आज धारुर ( Dharur ) तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या. तालुक्यातील रेपेवाडी/पाचीपिंपळा तलावाचे काम जलद गतीने व्हावे तसेच शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावे अशा मागण्या जिल्हाधिकारी मुधोळ यांच्याकडे करण्यात आल्या.

( Collector Deepa Mudhol’s visit to Dharur taluka. )

आज दि.19 बुधवारी बीडच्या ( Beed ) नवनियुक्त जिल्हाधिकारी ( Collector ) दीपा मुधोळ यांनी धारुर ( Dharur ) तालुक्यातील तेलगाव, भोपा, सोनीमोहा आदी गावांना भेटी दिल्या. येथील तहसील कार्यालयात राष्ट्रवादीचे ओबीसी सेल प्रदेश सरचिटणीस प्रा. इश्वर मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांचे शिष्टमंडळाने भेट घेतली यावेळी रेपेवाडी/पाचीपिंपळा तलावाचे काम जलद गतीने व्हावे लवकर करावे अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी पाची पिंपळा तांड्याचे पुनर्वसन व्हावे या साठी आमदार प्रकाशदादा सोळंके (Prakash Solanke) प्रयत्नशील असल्याचे प्रा. मुंडे यांनी सांगितले . यावेळी विजय राठोड, ग्राम पंचायत सदस्य, रूई, बालासाहेब पवार यांनी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देवून रेपेवाडी तलावाचे उर्वरीत काम लवकरात लवकर पूर्ण करून पुनर्वसनासाठी वाटप करण्यात येणारे प्लॅाट तात्काळ वाटप करून हस्तांतरीत करावे अशी विनंती केली. या वेळी पुनर्वसनासाठीचे प्लॅाट वाटप पंधरा दिवसात करू असे अश्वासन दिपा मुधोळ-मुंडे जिल्हाधिकारी, बीड यांनी दिले आहे.

भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे मराठवाडा अध्यक्ष सादेक इनामदार यांनी तालुक्यात अवकाळी पावसमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी केली. या वेळी विभागीय अधिकारी जोत्सना बाफना, तहसीलदार महादेव काळे, ईश्वर साठे उप अभियंता, लघू पाटबंधारे उप विभाग केज, प्राचार्य विजयकुमार मुंडे, रवि चोले, दिपक चोले व किल्ले धारूर येथील पत्रकार उपस्थीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!