आजपासून आठवडे बाजार बंद; नसता होणार दंडात्मक कारवाई.

किल्लेधारूर दि.17 जानेवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने जमाव बंदी आदेश काढल्यामुळे आता बाजारतळावर बाजार भरवण्यास बंदी असणार असून धारुर नगर परिषदेकडून (Municipal Council) तसे आवाहन करण्यात आले आहे.
(Weekly market in Dharur city closed from today; There will be no punitive action.)
बीड (Beed) जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. राज्य सरकारने निर्बंध (restrictions) कडक करत राज्यातील शाळा महाविद्यालय बंद करण्यात आली आहेत. राज्यभर दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी (Night curfew) जाहिर करण्यात आली आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी आजपर्यंत आठवडे बाजार (Weekly market) भरत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत आता स्थानिक प्रशासन सतर्क झाले असल्याचे दिसून येत आहे.
धारुर (Dharur) शहरात सोमवार व शुक्रवार हे दोन आठवडे बाजार आहेत. जमावबंदी आदेशाचे पालन करण्याच्या दृष्टीने पोलिस (Police) प्रशासनाच्या निर्देशानंतर नगर परिषदेकडून शुक्रवारी बाजार भरवण्यास मनाईचे आवाहन करण्यात आले. यामुळे आता शहरातील दोन्ही आठवडे बाजार आजपासून बंद राहणार आहेत.
मात्र फळविक्रेते, भाजी विक्रेते यांना गल्ली बोळात फिरुन विक्री करण्यास परवानगी असणार आहे. कोरोना नियमांचे (Corona guidelines) पालन करुन गर्दी होणार नाही याची काळजी घेत आता भाजी व फळ विक्री करावी लागणार आहे. जमावबंदी आदेशाची व कोरोना नियमांची पायमल्ली होत असल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याची माहिती नगर परिषदेच्या (Municipal Council) वतीने देण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. रविवारी तब्बल १२५ कोरोना बाधित (Corona Positive) आढळून आले आहेत. तर धारुर तालुक्यात गेल्या तीन दिवसात ७ रुग्ण आढळले आहेत तर एका कोरोना बाधिताच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे स्थानिक प्रशासन कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहे.