आ. अमित साटम यांचा धारुरात सत्कार

किल्लेधारुर दि.२७(वार्ताहर) मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे भाजपाचे BJP उमेदवार शिरीष बोराळकर Shirish Boralkar यांच्या प्रचारार्थ अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे आमदार अमित साटम Amit Satam यांनी भेट देत पदवीधरांना बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मतदान करुन विजयी करण्याचे आवाहन केले.

भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नगराध्यक्ष डॉ.स्वरूपसिह हजारी यांच्या निवासस्थानी आ.साटम Amit Satam यांनी भेट दिली. यावेळी आ.साटम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ.साटम यांनी बोराळकर Shirish Boralkar यांच्या प्रचार कार्याची माहिती घेतली. याप्रसंगी भाजपा BJP तालुका  अध्यक्ष ॲड. बालासाहेब चोले, शहर अध्यक्ष दत्ताभाऊ धोतरे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष ॲड मोहन भोसले, गट नेते रोहित हजारी, नगरसेवक बाळासाहेब खामकर, चोखाराम बापू गायसमुद्रे, सुरेश लोकरे, बालाजी चव्हाण इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!