थरारक… बीड शहरामध्ये गोळीबार; दोन जण जखमी.

बीड दि.25 फेब्रुवारी – बीड (Beed) शहरात नगर रोड भागात असलेल्या मुद्रांक व नोंदणी कार्यालयात आज शुक्रवार दि.25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता गोळीबाराची ( firing ) घटना घडली. या गोळीबारा दोन जण जखमी झाले असून या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

( The thrill of the shooting in the city of Beed; Two were injured. )

शहरात आता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला असून आज गोळीबारीसारखा गंभीर प्रकार घडला आहे. या गोळीबारात सतीश बबन क्षीरसागर (वय 30) राहणार लक्ष्मणनगर, बीड व फारूक सिद्दीकी (वय 28 ) राहणार जालना रोड, बीड अशी जखमींची नावे आहेत.

जखमी तरुण आज दि.25 फेब्रुवारी रोजी सकाळी येथील मुद्रांक व नोंदणी कार्यालयात (Stamp and Registration Offices) आले होते. यावेळी त्यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. यात दोघांच्याही पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

सदरील प्रकाराची माहिती कळताच पोलिस उपाधीक्षक (Deputy Superintendent of Police) संतोष वाळके, प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक रश्मीता एन. राव (Trainee Superintendent of Police Rashmita N. Rao), शिवाजीनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक केतन राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली असून या प्रकाराबाबत अद्याप गुन्हा नोंद झाला नाही.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!