कॉमेडियन भारती सिंहला अटक

मुंबई : दि.२१- बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात आता कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) हिचा पती अभिनेता हर्ष लिंबाचीया यांना एनसीबीने ताब्यात घेतल्यानंतर आता भारतीला अटक करण्यात आली आहे. या दोघांना NCB ने आधी समन्स बजावले होते. आज एनसीबीने NCB भारतीच्या घरी धाड टाकून झाडाझडती केली, त्यावेळी तिच्या घरी संशयित वस्तू सापडल्यानंतर एनसीबी NCB च्या अधिकाऱ्यांनी दोघांना ताब्यात घेतलं. भारतीला आता साडेसहाच्या सुमारास अटक करण्यात आली आहे तर तिचा नवरा हर्षची आधीच चौकशी सुरु आहे.