पहा धारुर शहराचा निकाल….

किल्लेधारूर दि.२९ (वार्ताहर) धारूर शहरातील दहावी शालांत परीक्षेचा निकाल उत्कृष्ट लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये हु.पापासिंह विद्यालयाचा सौरभ सुखदेव शिंपले याने ९४.२० टक्के गुण घेऊन शहरात प्रथम क्रमांक मिळवला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
धारूर शहरातील दहावी शालांत परीक्षेत सर्व शाळांचा निकाल उत्कृष्ट लागला आहे. शहरातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. हु.पापासिंह विद्यालयाचा निकाल ९५.७१, जनता माध्यमिक विद्यालयाचा ९४.४१% तर सरस्वती माध्यमिक विद्यालयाचा ८८.६५% निकाल लागला आहे. मिल्लिया उर्दू माध्यमिक शाळेचा ८३%, जि.प. माध्यमिक शाळेचा निकाल सर्वात कमी ६८% आला आहे. हु.पापासिंह विद्यालयाचा सौरभ सुखदेव शिंपले या विद्यार्थ्यांने ९४.२० % गुण घेऊन शहरात प्रथम तर याच शाळेच्या अभिषेक शंकर हंगे ९४% गुण घेऊन शहरात सर्व द्वितीय आला आहे. जनता माध्यमिक विद्यालयाची संपदा सिध्देश्वर रणदीवे ९३.६०% गुण मिळवत तिसरी आली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.