दिलासादायक …. कोरोनाच्या नव्या उपचार पध्दतीत बार्शीचा डंका; राज्यातील पहिला प्रयोग यशस्वी.

बार्शी दि.15 जून – कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र कोरोना संसर्गामुळे (Corona infection) होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण अद्याप कमी झालेलं नाही. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीशिवाय पर्याय नाही. मात्र आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी (Barshi) येथून कोरोना उपचारासंदर्भात दिलासादायक बातमी आली आहे. यानुसार कोरोना रुग्णांवर आता ओपीडी बेस उपचार होणार आहेत.
(Comfortable …. Corona’s new treatment in Barshi Danka; The first experiment in the state was successful.)
बार्शी (Barshi) येथील डॉ. संजय अंधारे (Dr. Sanjay Andhare) यांनी कोरोना संसर्ग (Corona infection) झालेल्या चार रुग्णांवर केलेल्या प्रयोगाला यश आलं आहे. मोनोक्लोनल अँटीबॉडी वापरामुळे हा प्रयोग यशस्वी झाला आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचं समजतं. प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेल्या अँटीबॉडीज म्हणजेच मोनोक्लोनल अँन्टीबॉडीज परिणामकारक ठरत असल्याचं समोर आलं आहे.
या पद्धतीमुळे कोरोना विषाणूला (Corona virus) लक्ष्य करणं शक्य होत आहे. तसेच शरीरात कोरोना विषाणूची होणार उत्पत्ती थांबवण्यात येते. हाच प्रयोग बार्शीतील डॉ. संजय अंधारे (Dr. Sanjay Andhare) यांनी यशस्वी केला आहे.
डॉ. अंधारे यांनी हा प्रयोग करण्याची परवानगी मिळाल्यानंतर त्यांनी अंधारे हॉस्पीटल येथील गंभीर रुग्णावर या पद्धतीने उपचार केले. त्याला यशही आले. एका डॉक्टरच्या ६५ वर्षीय आई आणि एका वकिलाच्या वडिलांवर या पद्धतीने उपचार करण्यात आले. दुसऱ्याच दिवशी त्यांना मोनोक्लोनल अँटीबॉडी (Monoclonal antibody) देऊन घरी पाठवण्यात आलं. विशेष म्हणजे त्यांच्या शरीरातून कोरोना विषाणू (Corona virus) नाहीसे झाले.
जगभरात या नव्या कोरोना संसर्गामुळे दहशत माजली होती. अनेक प्रयत्नांनंतर लसीकरणाचा पर्याय शोधण्यात आला. उपचार पध्दती बाबत अनेकांनी केलेला दावा फोल ठरला आहे. मात्र डॉ. अंधारे यांच्या या नवीन मोनोक्लोनल अँटीबॉडी (Monoclonal antibody) उपचार पध्दतीच्या यशस्वी प्रयोगामुळे अपेक्षा उंचावल्या आहेत.