कोरोंना विशेष

दिलासादायक …. महाराष्ट्राची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; मात्र डेल्टा प्लसचा धोका….

मुंबई दि.22 जून – महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत असलेला दिसून येत आहे. कोरोनाचा रोजचा आकडा मागिल काही दिवसांपासून दहा हजारांच्या खाली आला आहे. सोमवारी 6,270 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल 13,758 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,33,215 इतकी झालीय. आज 94 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मात्र नवीन डेल्टा प्लस व्हेरिअंटचे रुग्ण संख्येत वाढ होवून 21 झाल्यामुळे धोका वाढला आहे.

(Comfortable …. Maharashtra’s journey towards coronation; But the danger of Delta Plus ….)

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.89 टक्के एवढे झाले आहे. राज्यात सोमवारी 94 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.98 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,96,69,693 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,79, 051 (15.3 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,71,685 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,472 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

डेल्टा प्लसचे 21 केसेस- राजेश टोपे
या संदर्भात अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले, महाराष्ट्राने जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात निर्णय घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यातील 100 सॅम्पल घेण्याबाबत कार्यवाही सुरू केली आणि या महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी सीएसआयआर आणि आयजीआयबी या महत्त्वाच्या संस्थेचा सहभाग यामध्ये घेतला आहे. एनसीडीसीचे देखील सहकार्य घेण्यात आहे. 15 मे पासून 7500 नमुने घेण्यात आले आणि त्यांचे स्क्विन्सिंग करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे (Delta Plus variant) साधारणपणे 21 केसेस आढळून आले आहेत.

या केसेससंदर्भात पुढील कार्यवाही अशी करण्यात येत आहे की या इंडेक्स केसेसची संपुर्ण माहिती घेतली जात आहे. म्हणजे त्यांनी केलेला प्रवास, लसीकरण झाले होते का, त्यांना कोरोनाची पुन्हा लागण झाली का याबाबत माहिती घेऊन त्यांच्या निकट सहवासिताची तपासणी केली जात आहे.

त्याचबरोबर सारी आणि आयएलआयचे सर्वेक्षण केले जात आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लसचे जे म्युटेशन झाले आहे त्याबाबत सविस्तर माहिती जमा केली जात आहे. महाराष्ट्रात आढळलेल्या कोरोनाच्या डेल्टा प्लसचे (Delta Plus variant) रुग्ण रत्नागिरी, जळगाव, मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आहेत.
यात रत्नागिरीमध्ये 9, जळगावमध्ये 7, मुंबईमध्ये 2, पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्गमध्ये एक रुग्ण समोर आला आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

रुग्णांच्या प्रवासाचा इतिहास तपासणार
आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिलेल्या माहितीनुसार डेल्टा प्लसचे जे रुग्ण आढळलेत त्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती की नाही याची माहिती घेण्याचं काम सुरु आहे. तर, दुसरीकडे त्यांनी कुठे कुठे प्रवास केला होता याची माहिती घेतली जात आहे. डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील 2 ते 3 आठवडे सर्व जिल्ह्यांना 100 नमुने चाचणीसाठी पाठवण्यास सांगण्यात आलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!