दिनेश कापसे यांना पितृशोक ; धारुर नगर परिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी श्रीमंत कापसे यांचे निधन.

किल्लेधारूर दि.26 सप्टेंबर – नगर परिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी श्रीमंत कापसे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 83 वर्ष होते. ते महाराष्ट्र प्लंबिग असोशिऐशनच व सामाजिक संस्था कायाकल्पचे अध्यक्ष पत्रकार दिनेश कापसे यांचे वडील होत.
श्रीमंत दादाराव कापसे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर अंबाजोगाई येथे उपचार सुरु होते. आज दि.26 सोमवार रोजी सकाळी 10 वाजता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ते धारूर नगर परिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. त्यांच्या पार्थीवावर धारूर (Dharur) येथील पोलीस स्टेशन (Police Station) मागील वैकुंठ स्मशानभुमीत दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे पत्रकार दिनेश कापसे यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुलं, सुना नातवंड असा परिवार आहे. कापसे कुटूंबियांच्या दुःखात बीड24 न्यूज परिवार सहभागी आहे.
( Condolences to Dinesh Kapse; Shrimant Kapse, a retired employee of the Dharur municipal council, passed away. )